ए दिल है मुश्किल (२०१६) : वाचवा!! (पैसे, वेळ आणि स्वतःलाही)
भेंSsडी, बाहेर कुणाला बोललात तर राडा होईल, आधीच क्लिअर करतेय. फवादला बघायला पायजे, त्यात बंदीफिंदी घालायचे राडे झालेत, मग करण जोहर झाला तरी सपोर्ट करायला पायजे, म्हणून मी माती खाल्ली. तुम्ही खाल्ली पायजे असं नाय्ये. त्याहून दिवाळीत xxx वर करून लोळा.
-नीलम शहजादी
मुंबईत नशिबाने लाभणाऱ्या थंड हवेतली रविवार सकाळची झोप, साडेतीन रुपयाचं पेट्रोल आणि वट्ट रूपये एकशेसाठ अक्कलखाती जमा. मनस्ताप किती झाला त्याची गणतीच नाही.
-कलमवाली बाई
करण जोहराचा मी फॅन कधीच नव्हतो पण त्याच्या शत्रुपक्षातही नव्हतो. नेहमीच्या भारतीय पठडीपेक्षा वेगळ्या जाणिवा आणि फ्रेम्स यांच्यामुळे अपेक्षेने 'ए दिल है मुश्किल' पाहिला अक्षरश: तोंडावर आपटलो.
-दिगु टिपणीस
#प्रेमाचा पंचकोन किंवा कसंही #रटाळ किंवा कशीही कथा #लेखकाचा फार गुंता झाल्यावर कँसर होतोच किंवा कसंही #माणसाला आयुष्यात दोस्ती किंवा प्रेम करणं सोडल्यास अचानक गाता येतं किंवा कसंही #सेक्स केल्याशिवाय प्रेम म्हणजे दोस्ती किंवा कसंही #हा भिकार सिनेमा बघितल्यावर दिवाळीतला लाडू मेथीचा वाटू शकतो किंवा कसंही!
-धनंजय माने
हे हे हे, पैसे वाचले माझे. ट्रेलर बघूनच बघायचा नाही असं ठरवलं होतं. आता हे वाचलेले पैसे आपण व्हेंटिलेटर वर ठेवूयात म्हणजेच पुढल्या आठवड्यात रिलीज होणारा व्हेंटिलेटर पाहुयात
-जोशुआ
ए दिल है मुश्कील (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
