नटसम्राट (२०१६): [ऑडीयो रिव्ह्यू] चांगला अभिनय पण ढिसाळ पटकथा नि बेकार माध्यमांतर

नटसम्राटचा रिव्ह्यू वाचू नका तर थेट ऐका.

'पाहावे मनाचे' नेहमीच नवं काही घेऊन येत असते. गेल्यावेळी आपण व्हिडीयो रिव्ह्यू पाहिला. आता आहे श्राव्य परीक्षण अर्थात 'ऑडियो रिव्ह्यू'. हा प्रयोगही आवडेल अशी आशा आहे. वरच्या व्हिडीयो वर क्लिक करा, आणि रिव्ह्यू वाचण्याऐवजी ऐका! 'धनंजय माने' सांगताहेत की हा चित्रपट त्यांना कसा वाटला ते!

'धनंजय माने'चे चित्रपटाबद्दलचे थोडक्यात मत असे:

या सिनेमाचे संवाद असे आहेत की ऐकणारा 'आ' वासून ऐकतो; पण ते पोचतात किती? विचारायचं नाही! असे 'लय भारी' लांबलचक डायलॉग आणि ते बोलणारा नानांसारखा एक कसलेला अभिनेता इतक्या जोरावर सिनेमा तिकीट बारीवर चालू शकतो का? तर हो अर्थातच. पण इतक्याच पुंजीवर एक सिनेमा छान बनतो का? तर हा सिनेमा बघुन तरी तसं वाटत नाही.  नाना किंवा इतरही पात्रांचा अभिनय वजा केला तर चित्रपटात काय उरते? तर एक भेसूर शुन्य, कसंबसं तरलेलं दिग्दर्शन नि एक भीषण पटकथा! मुळात गोम पटकथेतच आहे. हा नटसम्राट अनेक वर्षे ज्या भुमिका करतोय त्याचा अंश त्याच्यात कसा उतरत चाललाय आणि ती पात्रांची मिसळ झालेली व्यक्ती आहे हे कुठेच उभे रहात नाही. त्यामुळे 'कस्सं कस्सं हल्लीची मुलं बै.. आई बापाला कशी वैट्ट वैट्ट वागवतात नै" बिच्चारे.. असं म्हणत प्रेक्षकांचे चुचकारणे आणि बालदीभर अश्रु याव्यतिरिक्त प्रेक्षक काहीच घेऊन जात नाही. त्यामुळे बेलवलकर हा नुसता विक्षिप्त व्यक्ती उरतो, तो तसा का बनलाय हे समोर येतच नाही!

====

हा 'ऑडियो रिव्ह्यू'चा प्रयोग अधिकाधिक सफाईदार करण्याचा मानस आहे. तेव्हा जरूर प्रतिक्रिया द्या आणि आम्हाला कळु दे की तुम्हाला या प्रयोगाबद्दल काय वाटते!

नटसम्राट (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

नटसम्राट (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: महेश मांजरेकर
  • कलाकार: नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, सुनील बर्वे
  • चित्रपटाचा वेळ: २ तास ३८ मिनिटे
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: -