आमच्या बद्दल

ध्येयघोषणा

जगभरात उत्तमोत्तम चित्रपट, नाटके व इतरही दृकश्राव्य प्रयोग होत असतात. "पाहावे मनाचे" चे मुख्य उद्दीष्ट आहे की जगभरात चाललेल्या विविध दृक-श्राव्य प्रयोगांचे - विशेषत: चित्रपट व नाटकांचे - परिचय व परिक्षणे मराठीतून  वाचकांपर्यंत पोचवणे. चित्रपटाची वा नाटकाची भाषा कोणतीही असली तरी या संस्थळावरील त्याचा परिचय, परिक्षणे व संबंधित लेखन मराठीतूनच होईल..

 

उद्दिष्टे

- चित्रपट/नाट्य परिक्षण ही एकाच साच्यातील अभिव्यक्ती न रहाता, विविध पद्धतीने व विविध अंगांनी कलाकृतीची ओळख करून देणे.

- चित्रपट असो वा नाटके, हा एकाच वेळी विविध कलांचा समुच्चय असतो तसेच विविध कलांचे अभिसरणही असते. या दोन्ही दृष्टिकोनातून अंतर्भूत कलांच्या दर्जाबद्दल तसेच त्यांच्या एकत्रित परिणामांबद्दल सजगता बाळगत परिक्षणे करणे.

- जगभरातील उत्तमोत्तम दृकश्राव्य कलाकृतीची ओळख मराठीतून करून देणे

- केवळ परिक्षणेच नाही तर चित्रपट व नाट्यविषयक विविध अंगांनी लेखन करणे.

वरील उद्दिष्टे गाठण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे अंगिकारली जातील. ही तत्त्वे केवळ व्यवस्थापनासाठी नसून आपल्या सर्वांसाठीच आहेत हे ध्यानात ठेवावे.

 

मार्गदर्शक तत्त्वे

- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत प्रतिसादकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.

- प्रसंगी आपल्या आवडत्या कलाकृतीवर कठोर टीका होऊ शकते हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. इथे येणारी परीक्षणे/लेखन हे लेखकाचा वैयक्तिक दृष्टिकोन असेल. एकाच कलाकृतीवर दोन वेगळे दृष्टिकोन मांडणारे लेखनही इथे संभवते.

-प्रतिसादातील अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग टाळावेत.

- उद्दिष्टांशी सुसंगत अशा पाहुण्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी अनौपचारिक भेटी, चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक कट्टे/संमेलने आयोजित करण्याचा व्यवस्थापन प्रयत्न भविष्यात करू शकेल.

- लेखकांच्या विचारांशी, प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी, व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन, मालक, संपादक, मॉडरेटर्स सहमत असतीलच असे नाही.

उद्दिष्टांचा पाठपुरावा मार्गदर्शक तत्त्वांनुसार होतो आहे याची काळजी घेण्यासाठी व्यवस्थापन खालील धोरणांनुसार कार्यवाही करेल.

धोरणे

- उद्दिष्टे व धोरणांमध्ये बदल करण्याचा अंतिम हक्क व्यवस्थापनाकडे आहे

- मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत प्रतिसाद अप्रकाशित अथवा नष्ट केला जाईल.

- प्रत्येक निर्णयाबाबत खुलासा करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर नाही.

श्रेय

संस्थळावर आणि संस्थळाच्या प्रसिद्धीमध्ये वापरलेल्या चित्राची (’लोगो’ची) संकल्पना आणि रेखाटन सीमा अरोलकर यांचे आहे.